ग्रापंच्या गैरकारभारावर प्रश्न केल्याने एका तरुणावर ग्रापं सदस्यांनीच जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना रायबाग तालुक्यातील बेंडवाड येथे घडली.

रायबाग तालुक्यातील बेंडवाड गावातील शिवानंद भीमप्पा पाटील वय 27 असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने बेंडवाड ग्राम पंचायतीत चाललेल्या गैरप्रकारांबाबत माहिती विचारण्याचा प्रयत्न केला असता, ग्रापं पिडिओने आमच्या पंचायतीच्या गैरप्रकारांची माहिती का विचारतो आहेस अशी विचारणा करत ग्रापं सदस्यांसह दगड आणि लाकडाने मारहाण करून झकमी केले.
शिवानंद पाटील या युवकाने बेंडवाड ग्रामपंचायतीशी संबंधित नरेगा योजनेची माहिती मिळविण्यासाठी अर्ज केला होता, मात्र तेथे बेकायदेशीर कामे सुरु असल्याची खबर लागताच त्याने चौकशी केली. त्यामुळे त्याच गावातील पंचायत सदस्य व समर्थकाने युवकावर जीवघेणा हल्ला केला. तरूण अजूनही गंभीर जखमी आहे. मानेला झालेल्या जबर दुखापतीमुळे त्याला बोलता येत नाही, म्हणून त्याने एका वहीत अलगगौडा पाटील, बसगौडा पाटील, मल्लाप्पा पाटील अशी हल्लेखोरांची नावे लिहून संताप व्यक्त केला. शिवानंदला पुढील उपचारासाठी गोकाक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणाच्या संदर्भात, मारहाण झालेल्या शिवानंदच्या भावाने प्रसारमाध्यमांना सांगितले की, याबाबत तक्रार देऊनही रायबाग पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नाही, त्यामुळे यामागे मोठा राजकीय सहभाग असल्याचा संशय बळावला आहे.


Recent Comments