Hukkeri

संकेश्वर शहरात जल्लोषात राज्योत्सव मिरवणूक.

Share

हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर शहरात कर्नाटक राज्योत्सव मिरवणूक मोठ्या थाटात पार पडली.

कर्नाटक रक्षण वेदिके आणि शहरातील विविध कन्नड समर्थक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्योत्सवाला सकाळी जगद्गुरूंच्या दिव्य सानिध्यात नाडदेवता भुवनेश्वरी देवीची पूजा करून प्रारंभ झाला. ध्वजारोहण करून मिरवणूक काढण्यात आली.

विविध शाळकरी मुलांनी राज्य, संस्कृती आणि कर्नाटक एकीकरण लढ्यातील सेनानींच्या वेशभूषेत सहभाग घेतला. नुकतेच निधन झालेले मंत्री उमेश कत्ती यांच्या चित्रांचे फलक मिरवणुकीत झळकावण्यात आले.

झांज पथक, ढोल-ताशे, लेझीमच्या तालावर लोकनृत्ये सादर करण्यात आली. तरुण-तरुणींनी मिरवणुकीत जल्लोषाने नृत्य करत सहभाग घेतला. सकाळपासूनच विविध गावातून दाखल झालेले कन्नड युवा रसिक बँड, डीजेच्या तालावर नाचत होते.

नगराध्यक्षा सीमा हातनूरी, उपाध्यक्ष अजित करजगी, स्थायी समिती अध्यक्ष सुनिल पर्वतराव, साहित्यिक प्रो चंद्रशेखर अक्की, करवे जिल्हा अध्यक्ष महेश हट्टीहोळी, नेते प्रमोद होसमनी, दिलीप होसमनी, संतोष मुडसी, राज्योत्सव समिती अध्यक्ष प्रीतम सुमारे, बंडू हतनुरे, उपाध्यक्ष आनंद हरगापूर, प्रशांत मण्णीकेरी, संतोष सत्यनायक आदी उपस्थित होते.

Tags:

/hukkeri-sankeshwar-kannada-rajyotsava/