Khanapur

हलशी येथे राज्योत्सव उत्साहात; आम. अंजली निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती

Share

खानापूर तालुक्यातील हलशी येथे मोठ्या उत्साहात राज्योत्सव साजरा करण्यात आला.

हलशी या गावात कर्नाटक राज्योत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास खानापूर मतदार संघाच्या आमदार अंजली निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार अंजली निंबाळकर म्हणाल्या, कर्नाटक राज्योत्सव कार्यक्रमात सहभागी होणारी या भागातील मी पहिली आमदार आहे. याआधीच्या आमदारांनी कर्नाटकाबद्दल आदर किंवा अभिमान दाखविला नाही. माझी मातृभाषा मराठी आहे परंतु कर्मभूमी कर्नाटक आहे. राजकारण आणि समाजसेवा करताना मला जात, धर्म, भाषेचा फरक कळत नाही. पूर्व माहीत नाही, पश्चिम माहीत नाही. त्यामुळे खानापुर तालुक्याचा ६० वर्षात न झालेला विकास आता होताना आपण पाहत असल्याचेही त्या म्हणाल्या.

हलशी गावात सर्वधर्मसमभावनेने नागरिक नांदतात. प्रत्येक धर्माचे सण – उत्सव या गावात मोठ्या उत्साहात आणि एकसंघ भावनेने साजरे केले जातात. एकसंघपणे नांदणाऱ्या ग्रामस्थांचे यावेळी आमदारांनी कौतुक केले.

यावेळी नंदगड ठाणे सीपीआर एस बी माळगोंड यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास हलशी ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान उपाध्यक्ष संतोष हांजी, उद्योजक सुनील हांजी, महांतेश कल्याणी, मारुती पाटील, राजेंद्र कब्बूर आदी उपस्थित होते.

Tags:

khanapur kannada rajyotsava