चिकोडी सहायक आयुक्त आणि उपविभागीय दंडाधिकारी संतोष कामगौड यांची अचानकपणे बदली करण्यात आली असून याच्या निषेधार्थ अनेक संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर आंदोलनासाठी उतरले आहेत.

चिकोडी सहायक आयुक्त आणि चिकोडी उपविभागाधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या संतोष कामगौड यांची तडकाफडकी बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सरकारच्या या निर्णयाविरोधात गेस्टहाऊस पासून उपविभागाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. राजकीय दबावापोटी, शेतकऱ्यांचे हितचिंतक, कार्यक्षम व प्रामाणिक माणूस असलेल्या संतोष कामगौडा यांची अचानक बदली करण्याचे आदेश देणाऱ्या सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.
गेली अनेक वर्षे विविध प्रकाराने निकाली काढून चिकोडीतील नागरिकांची संतोष कामगौड यांनी मने जिंकली आहेत. आपल्या कार्यालयासमोर शेतकरी आणि गरीब लोकांना कार्यालयीन वेळेत कधीही भेटण्याची परवानगी आहे असा फलक लावणारे एकमेव अधिकारी म्हणजे संतोष कामगौड. अशा लोकहितवादी अधिकाऱ्याची बदली रद्द करून त्यांच्या फेरनियुक्तीचा आदेश काढण्यात यावा, अशी मागणी करवे कार्यकर्ते, बी आर आंबेडकर शक्ती संघटना नेत्यांच्यावतीने सरकारकडे करण्यात आली आहे.
संतोष कामगौड यांच्या बदलीचा आदेश तातडीने मागे घेण्यात यावा, अशी मागणी तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे करण्यात आली आहे.


Recent Comments