उसाने भरलेला ट्रॅक्टर उलटल्याने चाकाखाली अडकून चाक जागीच ठार झाल्याची दुर्घटना निपाणी तालुक्यातील कारदगा-भोज रस्त्यावर घडली आहे.

40 वर्षीय संतोष श्रीकांत लट्ठे या चालकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हुनरगी गावचा रहिवाशी असलेला संतोष लट्ठे जवाहर साखर कारखान्याला गाळपासाठी ऊस घेऊन जात होता. त्यावेळी कारदगा-भोज रस्त्यावर त्याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला आणि त्याचा चाकाखाली अडकून मृत्यू झाला. मृत संतोष याच्या मागे वडील, आई, पत्नी, मुलगा, मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे. सदलगा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून तपास सुरू केला आहे.


Recent Comments