चिक्कोडीचे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले संतोष कामगौडा यांची अचानक बदली झाल्यानंतर 2020 बॅचचे आयएएस अधिकारी माधव गीते यांनी चिक्कोडीचे नवे प्रांताधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. माधव गीते हे मूळचे नांदेड, महाराष्ट्राचे असून 2020 च्या आयएएस बॅचमधून उत्तीर्ण झाले आहेत.

यापूर्वी त्यांनी एक वर्ष धारवाड येथे प्रभारी प्रांताधिकारी म्हणून काम पाहिले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना नूतन एसी माधव गीते यांनी, चिक्कोडी उपविभागातील जनतेच्या समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याचे सांगितले.


Recent Comments