खानापुर शहर व तालुक्यात ६७ वा कन्नड राज्योत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

खानापूर तालुका प्रशासनाच्यावतीने जुन्या तहसीलदार कार्यालयात आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्याहस्ते भुवनेश्वरी देवी प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

खानापूर भागातील ऐतिहासिक ठिकाण असलेल्या नंदगड, हलसी, बिडी या गावात मोठ्या उत्साहात राज्योत्सव साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून मिरवणुकीत सहभाग घेतला. कलापथक, सांस्कृतिक पथक तसेच ढोल – डॉल्बीच्या तालावर खानापूरमधील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली.
तहसीलदार प्रवीण जैन, पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे, सतीश माळगोंड यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी राज्योत्सव कार्यक्रमात सहभाग घेतला.


Recent Comments