Nippani

निपाणी येथे तालुका प्रशासनाच्यावतीने राज्योत्सवाचे आचरण

Share

सीमावर्ती भाग म्हणून परिचित असलेल्या निपाणी भागात देखील कन्नड भाषिकांनी आज कर्नाटक राज्योत्सव साजरा केला.

निपाणी शहरात तालुका प्रशासनाच्या वतीने राज्योत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार प्रवीण कारंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी भुवनेश्वरी देवीच्या प्रतिमेचे पूजन करून, ट्रॅक्टर चालवून ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात केली.

म्युनिसिपल हायस्कूल मैदानापासून जुना पी बी रोड, संभाजी सर्कल, जत्राटवेस, बसवेश्वर सर्कल, महादेव मंदिर, गांधी चौक, कोटीवाले कॉर्नर मार्गे कित्तूर चन्नम्मा चौकात येऊन मिरवणुकीची सांगता झाली. या मिरवणुकी शालेय विद्यार्थी, तरुण – तरुणींसह विविध कलापथकांचा सहभाग होता. याचप्रमाणे कर्नाटकातील ऐतिहासिक स्थळांवर आधारित चित्ररथांचा देखील सहभाग होता.

चिंचणी येथील श्री अल्लामप्रभू महास्वामी यांनी उपस्थितांना आशीर्वाद दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मल्लिकार्जुन स्वामी, समाधी मठाचे प्राणलिंग स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नगरपालिका अध्यक्ष जयवंत बाटले, सभापती राजू गुंदेशा, सीपीआय संगमेष शिवयोगी, पीएआय कृष्णवेणी गर्लहोसूर, विभागीय शिक्षणाधिकारी रेवती मठद, सरकारी कर्मचारी संघाचे अध्यक्ष महादेव गोकार, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी रवी हुक्केरी, कृषी विभागाचे पुरुषोत्तम पिराजी, पशुवैद्य कंकणवाडी, हेस्कॉम अभियंते अक्षय चौगुले, कसापच्या माजी अध्यक्षा विद्यावती जनवाडे आदींसह तालुकास्तरीय अधिकारी, कन्नड संघटनांचे पदाधिकारी, शालेय शिक्षक, विद्यार्थी आणि निपाणी येथील कन्नड भाषिक नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

Tags:

nippani-karnataka-rajyotsava/