श्रीशैल जगद्गुरूंच्या ऐतिहासिक पादयात्रेला आजपासून सुरुवात होणार असून या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी पादयात्रेसाठी मोफत औषधे दिली.

चिक्कोडी तालुक्यातील येडूर ते आंध्रप्रदेशमधील श्रीशैल मल्लिकार्जुन ही ऐतिहासिक पदयात्रा आजपासून ३३ दिवस चालणार आहे.त्या पार्श्वभूमीवर चिक्कोडी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने येडूरच्या काडसिद्धेश्वर मठात श्रीशैल जगद्गुरूंच्या उपस्थितीत मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. पायी चालत जात असताना कोणी आजारी पडल्यास त्यांना या औषधांचा उपयोग व्हावा हा हेतू त्यामागे आहे. यावेळी श्रीशैल जगदगुरू यांनी भाषण करून पदयात्रेला मोफत औषधे देणाऱ्या व्यापाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
याप्रसंगी राजू डांगे, सचिन हलप्पनवार, राजू सुंके, बसवराज चोंचनवार, संजू मोने, अक्षय बिलवडे, प्रवीण माने, डॉ. दीपक पाटील, प्रकाश पाटील, धमेंद्रनाना पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments