नंदगड ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सातत्याने पुढे येत असून यामुळे विकासकामे खुंटली आहेत. यामुळे येथील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. नंदगड ग्राम पंचायतीच्या अध्यक्षा विद्या मादर यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर, सदर आरोप सिद्ध झाल्यास आपण शिक्षेसाठी तयार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

नंदगड ग्रामपंचायत अध्यक्षा विद्या मादर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत असून या गोंधळामुळे येथील जनता मूलभूत सुविधांपासून वंचित राहिली आहे. येथील जनतेला मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी सहकार्य करावे यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले. तालुका पंचायतीसह इतर वरिष्ठ अधिकारी, आणि उपाध्यक्षांसह २० जणांनी भ्रष्टाचारासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. आपल्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपासंदर्भातील कोणत्याही चौकशीसाठी आणि आरोप सिद्ध झाल्यास शिक्षेसाठी आपण तयार असल्याचे विद्या मादर यांचे म्हणणे आहे.
सभेचे आयोजन करून जनतेच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत नंदगड ग्राम पंचायत अध्यक्षा विद्या मादर यांनी मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. पती-पत्नीच्या भांडणात मुलांची परवड होत असल्याचा प्रकार याठिकाणी घडत असून या सर्व गोष्टी दूर सारून नागरिकांच्या सोयोसाठी, मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले. आपल्यावर झालेले आरोप, त्याबाबत अधिकाऱ्यांकडे केलेली तक्रार यावर चौकशी व्हावी, मात्र आपण बोलाविलेल्या बैठकीत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, आपल्यावरील आरोप सिद्ध झाल्यास आपण शिक्षेसाठी तयार असल्याचे त्या म्हणाल्या
नंदगड ग्रामपंचायतीच्या अध्यक्षांविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. उपाध्यक्ष, सदस्य आणि काही अधिकाऱ्यांनीही त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे. मात्र आपल्यावरील आरोप सिद्ध झाल्यास आपण शिक्षेसाठी तयार आहोत परंतु तोवर नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व सदस्यांनी एकत्रित येऊन विकासकामे राबविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्या या आवाहनाला इतर सदस्य प्रतिसाद देतील का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.


Recent Comments