Hukkeri

पुनीत राजकुमार यांचे कार्य सर्वांसाठी आदर्श : डॉ. प्रवीण राऊत

Share

हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर येथे पत्रकारांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कन्नड अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने संकेश्वरमधील मुरुगडे रुग्णालयात एम एम जोशी नेत्रविज्ञान संस्थेच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

हुक्केरी आणि संकेश्वर मधील पत्रकारांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. प्रवीण राऊत म्हणाले, कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते पुनीत राजकुमार हे केवळ अभिनेतेच नव्हते तर त्यांनी अनेक समाजाभिमुख उपक्रम करत समाजासाठी एक आदर्श घालून दिला. त्यांनी दिलेल्या आदर्शानुसार आज आपल्या रुग्णालयाच्या वतीने मोफत नेत्रतपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

रुग्णालयाचे पर्यवेक्षक बाळू बागी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना पुनीत राजकुमार यांनी केलेल्या नेत्रदानाविषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे तरुण पिढीमध्ये मधुमेहाचे प्रमाण अधिक जाणवत असून तरुणांनी नेत्रतपासणी करून घेण्याविषयी सल्ला दिला. याचवेळी नेत्रदानाविषयी त्यांनी जनजागृतीपर माहिती दिली.

यावेळी डॉ. भूषण, विलास बागी, राजू गुंडकल्ले, राकेश साने, इम्तियाज मकानदार, रामचंद्र किवंडा, संगीता सन्नक्की, शैला तलवार, सरिता गाडीवड्डर, सुगंधा कस्तुरी आदी उपस्थित होते.

Tags:

hukkeri eye test camp