Kagawad

कागवाड येथे आ. श्रीमंत पाटील यांच्याहस्ते विकासकामांचा शुभारंभ

Share

कागवाड विधानसभा मतदार संघातील सर्व गावातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या निधीतून आज येथील रस्त्यांच्या विकासकामांचा शुभारंभ आमदार श्रीमंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.

गुरुवारी कागवाड मतदार संघातील जकारट्टी गावात ४ कोटी रुपयांच्या निधीतून मदभावी संबरगी आणि १.५० रुपयांच्या निधीतून जकारट्टी ते खुट्टी शेतवाडीपर्यंतच्या रस्त्याच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार श्रीमंत पाटील म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली होती. या भागातील जनतेने या रस्त्याच्या डागडुजीसाठी मागणी केली होती. गेल्या दोन वर्षांमागे कोरोनामुळे विकासकाम करणे शक्य झाले नाही. मात्र आता आपण याप्रश्नी जातीने लक्ष घालून मुख्यमंत्र्यांकडे येथील रस्त्यांच्या विकासकामासाठी निधीची मागणी केली. यानुसार २०० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून येत्या वर्षात येथील रस्त्याच्या विकासासाठी आणखी निधी मंजूर करण्याचे आश्वासनदेखील देण्यात आले आहे. येथील विविध रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत असल्याचे आमदार श्रीमंत पाटील यांनी सांगितले.

यावेळी अभियंते जे ए हिरेमठ, वीराण्णा वाली, मल्लिकार्जुन मगदूम, नेते आर एम पाटील, ईश्वर कुंभार, मरगप्पा मगदूम, लक्ष्मण आवळे, इराप्पा शिरगुरे, शंकर मुजागोनी, चन्नाप्पा पाटील आदींसह अनेक नेते, अधिकारी, कंत्राटदार आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags:

kagawad shrimant patil road work