Belagavi

ग्रापं अध्यक्षांचे घर चोरट्यांकडून लक्ष्य! रोख २३ लाख आणि १२० ग्राम सोन्यावर डल्ला

Share

ग्रामपंचायत अध्यक्षांच्या घरावर डल्ला मारून चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने पळविल्याची घटना रामदुर्ग तालुक्यातील बन्नूर तांडा येथे घडली आहे.

बन्नूर ग्राम पंचायत अध्यक्ष चंद्रशेखर रजपूत यांचे घर फोडून चोरट्यांनी २३ लाख रुपयांची चोरी केली आहे. याचबरोबर १२० ग्राम सोन्याचे दागिने देखील पळविले आहेत. मध्यरात्री झालेल्या या घटनेनंतर चोरांनी पलायन केले आहे.

पीडीओ असलेल्या मुलाचे अकाली निधन झाल्यानंतर विमा रक्कमेच्या स्वरूपात आलेली रक्कम चंद्रशेखर यांनी आपल्या घरात ठेवली होती. घटनेनंतर एएसपी महानिंग नंदगावी, आमदार महादेवप्पा यादवाड यांनी भेट देऊन पाहणी केली. कटकोळ पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

Tags:

gp-president-house-robbed/