Khanapur

अबकारी पथकाकडून खानापुरात 909 लिटर गोवा दारू जप्त

Share

गोवा राज्यातून आणण्यात येत असलेली गोवा बनावटीची 909 लिटर अवैध दारू जप्त करण्यात अबकारी विभागाला यश आले आहे. या प्रकरणी एका आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे.

होय, मिळालेल्या पक्क्या खबरीवरून उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी खानापूर तालुक्यातील कणकुंबीजवळ सोमवारी मध्यरात्री छापा टाकून ही कारवाई केली. टाटा टर्बो एक्स-1109 मालवाहू वाहनातून अवैधरित्या वाहतुक केलेल्या विविध कंपन्यांची 909 लिटर गोवा बिअर जप्त करण्यात आली. या छाप्यात एकूण 9 लाख 33 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत अबकारी विभागाचे खानापूर झोनचे उत्पादन शुल्क निरीक्षक दावलसाब शिंदोगी, सदाशिव कोर्टी, उपनिरीक्षक जयराम हेगडे, पुष्पा गडदे, कर्मचारी मंजुनाथ बालगप्पनवर, इरण्णा घाडी, प्रकाश डोणी, अरुणकुमार बंदिगी, रायप्पा मन्निकेरी आदींचा सहभाग होता. उत्पादन शुल्कच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

Tags:

khanapur exise raid 909 ltr wine seize