काँग्रेसवाल्यांना आधी त्यांच्या पापाचा पश्चाताप होऊ द्या. त्यानंतर त्यांनी भारत जोडो यात्रा काढावी अशी खिल्ली केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी उडवली.
राणी चन्नम्मा यांच्या कित्तूर उत्सवानिमित्त हुबळीतील चन्नम्मा सर्कल येथे राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, ‘भारत जोडो’ यात्रा ही ‘काँग्रेस तोडो यात्रा’ बनली आहे. अनेकजण काँग्रेसचे छोडो करत आहेत. काँग्रेसने काय करावे तर पाकिस्तानला सोडलेले काश्मीर किंवा चीनला सोडून दिलेली जमीन पुन्हा जोडो करावी, अशी खिल्ली उडवली.

ज्यांनी काँग्रेस तोडो केला त्यांना आधी पक्ष जोडो करूद्यात. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत स्वच्छ जोडो झाला आहे. तुम्ही काय पाप केले, तुमच्या पापाचे परिमार्जन होऊ दे म्हणू जोडो यात्रा करा, तुमच्या पापांचा आधी पश्चात्ताप करा, मग भारत जोडो करा असा उपहास जोशी यांनी केला.
राहुल गांधींना कुणी लिहिलं तर ते वाचून दाखवतात. राहुल गांधींना लेखी प्रश्न सोडून वेगळा प्रश्न विचारला तर ते उत्तर देऊ शकणार नाहीत. त्यांना तोंडपाठ केलेल्या गोष्टींशिवाय ते उत्तर देऊ शकत नाहीत. त्यावर आपण काय प्रतिक्रिया देणार असा उपहासात्मक प्रतिसवाल त्यांनी केला.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांनी दिवाळीनंतर दिल्लीत येणार असल्याचे सांगितले आहे. आम्ही बसून बोलू, असे सांगत दिवाळीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रल्हाद जोशी यांनी साकेत दिले.
म्हादई आंदोलनकर्त्यांवर मंत्री जोशी चांगलेच गरम झाल्याचे दिसून आले. ज्यांना आंदोलन करायचे त्यांना काहीही करू द्या. लोकांना पाणी हवे आहे, ते कसे येईल हे हवे आहे. पाटबंधारे मंत्री गोविंद कारजोळ यांनी मोठ्या मेहनतीने चांगले काम केले आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून ते चांगले काम करत आहेत. जंगलाचा ऱ्हास कमी झाला पाहिजे. तंत्रज्ञानाचा वापर करून जंगल वाचवले पाहिजे. वर्षभरात पाणी येईल. हे शेतकऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. मात्र काही निरुद्योगी लोक दह्यात खडे शोधण्याचे काम करत असल्याचे सांगत माजी आमदार कोनरेड्डी यांना जोशी यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सौंदत्तीचे आमदार व विधानसभेचे उपसभापती आनंद मामनी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. आनंदा मामनी हे तीन वेळा आमदार असलेले माझे निकटचे सहकारी होते. पंधरा दिवसांपूर्वी मी त्यांना भेटलो होतो. मामनी ही लढाई जिंकतील अशी आशा बाळगली होती. त्यांचा खूप दृढ विश्वास होता. मी डॉक्टरांशी बोललो. मात्र उपचार असफल झाल्याने आनंद मामनी यांचा मृत्यू झाला. दिवाळीच्या आनंदाच्या सणातच त्यांचे निधन झाले हे अतिशय दुःखद आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, हे दुःख सहन करण्याचे त्यांच्या कुटुंबीयांना बळ देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो अशा शब्दात प्रल्हाद जोशी यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.
भारत पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, आज भारत जिंकेल, भारताने जिंकले पाहिजे आणि जिंकेल यात शंका नाही, असा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला.


Recent Comments