Banglore

आमदार आनंद मामनी यांचे निधन : सौंदत्ती मतदारसंघ शोकसागरात

Share

सौंदत्तीचे आमदार आणि कर्नाटक विधानसभेचे उपाध्यक्ष आनंद मामनी यांचे निधन झाले. ते काही दिवसांपासून आजारी होते. उपचारांचा उपयोग न होता आज त्यांचे निधन झाले.


सौंदत्ती विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंद मामनी यांचे आज रविवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सौंदत्ती मतदार संघ शोकसागरात बुडाला आहे. ते प्रसिद्ध सौंदत्ती रेणुका-यल्लम्मा देवस्थान सिमतीचे अध्यक्षही होते.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आनंद मामनी यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.’आमच्या पक्षाचे आमदार आणि माननीय विधानसभेचे उपाध्यक्ष आनंद चंद्रशेखर मामनी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला अतिशय दुःख झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशी मी प्रार्थना करतो, ओम शांती’ असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले
आहे.

Tags:

anand mamni dead cm bommaiah condolence