Hukkeri

हुक्केरीत उद्या अप्पनगौडा यांची 48 वी पुण्यतिथी : जी.सी. कोटगी.

Share

हुक्केरी तालुक्‍यातील स्वातंत्र्यसेनानी, सहकार क्षेत्रातील भीष्म दिवंगत अप्पनगौडा पाटील यांची 48 वी पुण्यतिथी उद्या, 23 ऑक्टोबर रोजी एसडीव्हीएस संघाच्या प्रांगणात अर्थपूर्णपणे साजरी केली जाणार आहे असे संघाचे सचिव जी. सी. कोटगी यांनी सांगितले.

आज संकेश्वर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना कोटगी म्हणाले की, शिक्षण आणि सहकार क्षेत्रात महान कार्य केलेल्या दिवंगत अप्पनगौडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थी आणि आमच्या संस्थेत सेवा करून निवृत्त झालेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे.

एसडीव्हीएस संघाचे प्रशासक डॉ. बी. ए. पुजारी म्हणाले की, अप्पनगौडा यांची समाजसेवा अफाट असून त्यांनी शिक्षण, वीज, साखर कारखाना यासह अनेक संस्था स्थापन करून कामगारांसाठी शिक्षण व रोजगार निर्माण केला. त्यांची 48 वी पुण्यतिथी उद्या अर्थपूर्णरित्या साजरी करण्यात येणार आहे.

यावेळी जी. एस. इंडी, ऍड. आर. बी. पाटील उपस्थित होते.

Tags:

/hukkeri-appanagoudar-death-anniversary/