पंचमसाली समाजाला आरक्षण मिळावे या मागणी साठी आज हुक्केरी मध्ये भव्य परिषद भरविण्यात आली होती. यावेळी अ. भा. लिंगायत पंचमसाली महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजायानंद काशप्पन्नवर यांचे भाषण सुरु असताना पृथ्वी कत्ती यांनी आक्षेप घेतल्याने काहीवेळ गोंधळ निर्माण झाला.


पंचमसाली समाजासाठी २ए आरक्षणाच्या मागणीसाठी कुडलसंगम पंचमसाली पिठाच्या बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली भव्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार रमेश कत्ती यांचे चिरंजीव पृथ्वी कत्ती आणि काँग्रेसचे माजी आमदार आणि अ. भा. लिंगायत पंचमसाली महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजायानंद काशप्पन्नवर यांच्यात निवडणुकीच्या मुद्द्यावरून वाद होऊन काहीसा गोंधळ निर्माण झाला.
व्यासपीठावरून बोलत असताना विजयानंद काशप्पन्नवर यांनी माजी मंत्री ए. बी पाटील यांच्या नावाचा उल्लेख केला. याचवेळी पृथ्वी कत्ती यांनी व्यासपीठाच्या खालून आवाज देत काशप्पन्नवर यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविला. यावेळी उपस्थितांनी पृथ्वी कत्ती हे रमेश कत्ती यांचे चिरंजीव असल्याचे सांगितले. मात्र यावर मीही एका माजी मंत्र्यांचा मुलगा असल्याचे काशप्पन्नवर म्हणत होते. यावेळी उभयतांमध्ये काहीवेळ वादावादी झाल्याने सभेत गोंधळ निर्माण झाला.


Recent Comments