बैलहोंगल तालुक्यातील वक्कुंद या गावात मस्जिद परिसरात कंपाउंड बांधण्यात येत असून या कामकाजाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले.

वक्कुंद गावातील प्रभाग क्रमांक ४ मधील मस्जिद आवरणात ग्राम पंचातीच्या अनुदानातून कंपाउंड बांधण्यात येत आहे. या कामकाजाचा शुभारंभ सविता हुवीन यांच्याहस्ते भूमिपूजनाने करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष सुभाष मेक्केद, पीडीओ विजयालक्ष्मी अनगोळ, ग्राम पंचायत सदस्य मुदकप्पा बिच्चून्नवर, बसवराज कोरिकोप्प, मस्जिद कमिटी अध्यक्ष दस्तगीर नदाफ, उपाध्यक्ष मेहबूब बुड्डेनायकर, पदाधिकारी गफासाब नदाफ, महम्मद नदाफ, राजू मदलमट्टी आदी उपस्थित होते.


Recent Comments