Crime

बनावट नोटा चलनात आणणाऱ्या खतरनाक खिलाडींना अटक

Share

बनावट नोटा चलनात आणण्यासाठी आलेल्या खतरनाक खिलाडींना बेड्या ठोकण्यात हुबळीच्या उपनगर पोलिसांना यश आले आहे.

होय, हुबळी येथील एका खासगी हॉटेलमध्ये विजापूरमधून बनावट नोटा चलनात आणण्यासाठी काहीजण आल्याची पक्की खबर मिळाल्यावरून हुबळी उपनगर पोलिसांनी सापळा रचून या हॉटेलवर छापा टाकून ही कारवाई केली. उपनगर पोलिसांनी या छाप्यादरम्यान तीन आरोपी पकडले तर एक आरोपी फरार झाला.
आरोपींकडून 200 रुपये दर्शनी मूल्याच्या 129 बनावट नोटा, 100 दर्शनी मूल्याच्या 77 बनावट नोटा आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचा एक डॉलर आणि संबंधित प्रमाणपत्र आणि 100 रुपये दर्शनी मूल्याच्या 20 अस्सल नोटा, एक प्रिंटर मशीन, प्रिंटिंग इंकचे 4 डबे जप्त केले आहेत.

या संदर्भात गुन्हा दाखल करून हुबळी उपनगर स्थानकाच्या पोलिसांनी बनावट नोटा चलनात आणण्यासाठी आलेले गुरुराज कल्लैया पट्टदमठ, शिवानंद कारजोळ, कन्नड मासिक चंदाचा पत्रकार दत्तात्रेय कुंबार या चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Tags:

bogus note 4 aropi arrest