Hukkeri

हुक्केरी पंचमसाली मेळाव्याला लाखो लोक येणार : बसवजय मृत्युंजय स्वामीजी

Share

हुक्केरी शहरात 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पंचमसाली आरक्षण संघर्ष मेळाव्यात राज्याच्या विविध भागातून लाखो लोक सहभागी होणार आहेत अशी माहिती कुडलसंगम पीठाचे जगद्गुरू बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांनी दिली.

हुक्केरी शहरातील विजय रवदी यांच्या फार्महाऊसवर आज आयोजित मध्यवर्ती कार्यक्रमात बोलताना बसवजय मृत्यूंजय स्वामीजी म्हणाले, राज्य सरकारने आमच्या आरक्षणाच्या लढ्याला तत्काळ प्रतिसाद न दिल्यास समाजातील अंदाजे 25 लाख लोक ‘बेंगळुरू चलो ‘ आंदोलनात भाग घेऊन विधानसौधला घेराव घालतील. आम्हालाही 2-ए आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी आंदोलन पुकाररण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कुडलसंगम जगद्गुरूंच्या लढ्याला आपला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील पंचमसाली लिंगायत समाजाचे लोक लाखोंच्या संख्येने मेळाव्यात सहभागी होणार असल्याचे माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पंचमसाली जिल्हा कार्याध्यक्ष आर. के. पाटील, माजी मंत्री शशिकांत नाईक, डॉ. राजेश नेर्ली, विजय रवदी, गुंडू पाटील, रवींद्र जिंद्राली, ऋषभ पाटील, धरप्पा ठक्कनवर, शिवनायक नाईक, बसनगौडा पाटील, चिदानंद करदन्नवर, संतोष मुडसी आदी उपस्थित होते. त्या नंतर स्वामीजी आणि पंचमसाली नेत्यांनी नियोजित मेळावास्थळी भेट दिली.

Tags:

hukkeri-basavjaymrityumjayswamiji-samavesh-pressmeet/