Athani

चन्नम्मा वीर ज्योतीचे अथणीत भव्य स्वागत

Share

कित्तूर उत्सवानिमित्त राज्यभरात काढण्यात येत असलेल्या वीरराणी कित्तूर चन्नम्मा ज्योतीचे अथणी शहरात भव्य स्वागत करण्यात आले. बसवेश्वर सर्कलमध्ये वीर राणी कित्तूर चन्नम्मा यांच्या वीर ज्योती यात्रेचे तालुका प्रशासनाच्या वतीने शानदार स्वागत करण्यात आले.
अथणीतील बसवेश्वरा सर्कल येथे चन्नम्मा वीर ज्योतीचे पुष्पहार घालून पूजन करून यात्रेचे स्वागत करण्यात आले. ही सवाद्य मिरवणूक बसवेश्वर सर्कल, शिवयोगी सर्कल, आंबेडकर सर्कल ते गच्चीनमठापर्यंत निघाली.


कित्तूर महोत्सवाच्या वीर ज्योती यात्रेच्या स्वागत समारंभात बोलताना, शेट्टर मठाचे मरुळसिद्ध स्वामीजी आणि मोटगी मठाचे चन्नबसव स्वामीजी यांनी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढताना प्राणाची आहुती देणाऱ्या कित्तूरच्या वीरराणी चेन्नम्मा यांचे शौर्य, साहस आणि देशभक्ती आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. इंग्रजांविरुद्ध शौर्य दाखवून स्वातंत्र्याची ठिणगी पेटवणाऱ्या वीर राणी चेन्नम्मा यांचा संघर्ष प्रेरक आहे. वीरराणी चन्नम्मा, क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांची चरित्रे आजच्या मुलांना कळायला हवीत असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी तहसीलदार सुरेश मुंजे, ता पं अधिकारी शेखर करबसप्पागोळ, इरण्णा वाली, इरण्णा दड्डी, उदयगौडा पाटील, बसगौडा कागे, सुरेश वालिकार, चिदानंद सवदी, गजानन मंगसुळी, अस्लम नालबंद, रमणगौडा पाटील, शब्बीर सातबच्चे, अप्पासाहेब अलाबादी, महांतेश टक्कन्नवर, शिवा गुडमपुर, महिला व बालकल्याण विभागाच्या पर्यवेक्षक व अंगणवाडी सेविका, महसूल विभागाचे अधिकारी, कन्नड समर्थक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी मिरवणुकीत सहभागी झाले होते.

Tags:

athani chennamma veerjyoti swagat welcome