वायव्य कर्नाटक परिवहन कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे असे परिवहन मंडळाचे हुक्केरी येथील आगर व्यवस्थापक विजयकुमार कागवाडे यांनी सांगितले.

केएसआरटीसीच्या हुक्केरी आगारामधील चालक, वाहक आणि तांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आज उद्घाटन केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या हितासाठी बस चालक, वाहकांची मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन विजयकुमार कागवाडे यांनी केले.

त्यानंतर बोलताना बसस्थानक नियंत्रण अधिकारी सुनील बोंगाळे यांनी, परिवहन कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून संस्थेने केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य आणि डोळ्यांचे संरक्षण आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी महावीर भोळे, बी.एल.पाटील, एम.एच.नदाफ, विनोद शिंगे, ए.एस.पाटील आदी परिवहन कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments