: शासनाद्वारे प्रदान केलेले सर्व विशेषाधिकार ग्रामीण डाक सेवकांना प्रदान केले जातील तसेच विभागाच्या अधिका-यांकडून त्यांचे शोषण होऊ दिले जाणार नाही किंवा त्यांना अन्यायकारक वागणूक दिली जाणार नाही. कर्मचार्यांनीही त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे असे आवाहन चिक्कोडी विभागाचे पोस्टल अधीक्षक एम. आर. कामगौडा यांनी केले.

अखिल भारतीय ग्रामीण डाक कर्मचारी संघटनेच्या चिकोडी शाखेच्यावतीने चिकोडी शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात आयोजित द्वैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना एम आर कामगौडा म्हणाले, चिक्कोडी विभागातील टपाल कर्मचाऱ्यांना मानवीय आधारावर योग्य ती मदत दिली जात आहे. कर्मचाऱ्यांनीही विभागाच्या निर्देशानुसार पारदर्शकपणे काम करावे. अधिकाऱ्यांचा मान राखावा, कर्तव्ये आणि अधिकार समानतेने आणि कार्यक्षमतेने हाताळावेत असा सल्ला त्यांनी दिला. ( )
ग्रामीण भागातील सेवक संघाचे मुख्य कायदेशीर सल्लागार एस.एस. मंजुनाथ म्हणाले, ग्रामीण टपाल कर्मचाऱ्यांनी कायदेशीर चौकटीत राहून प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. डाक सेवकांना कायमस्वरूपी पेन्शन, शास्त्रोक्त वेतन आयोग लागू करणे यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सातत्याने संघर्ष सुरू आहे. मात्र, केंद्र सरकार आमचे म्हणणे ऐकून घेत नसून ग्रामीण डाक कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्यात येत आहे. मागणी पूर्ण करण्यासाठी १६ नोव्हेंबरपासून दिल्लीत उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
असोसिएशनचे बेंगळुरू झोन अध्यक्ष के. प्रल्हादराव म्हणाले, ग्रामीण टपाल कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या संघर्षातून पूर्ण झाल्या असून आपल्याला कोणी भिक्षा दिली नाही. यामुळे आपल्याला मिळणाऱ्या सुविधांचा लाभ प्रत्येक डाकसेवकाने घ्यावा असे त्यांनी सांगितले.

असोसिएशनचे बेंगळुरू झोन सचिव के. एस. रुद्रेश यांनी ग्रामीण टपाल कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने दिलेल्या विशेषाधिकारांची माहिती दिली.
चिक्कोडीचे उप पोस्ट अधीक्षक आर.के.उमराणी, असोसिएशन उत्तर कर्नाटक विभागाचे सचिव अशोक मनगुळी यांची भाषणे झाली. बेंगळुरू झोनचे कार्याध्यक्ष बी.एल. हुगार, चिक्कोडी पोस्टल इन्स्पेक्टर सोमशेखर सारापुरे, अथणी पोस्टल अधीक्षक मल्लिकार्जुन कलशेट्टी, एआयसीईयू ग्रुपचे सचिव दर्शन उपाध्ये, व्ही.एस. लेले, एम.एल माने, एम पी मोळवाडे, सी. एस. मोरे, एल एस मोळे, यु ए पोतदार, आर.एस. कोष्टी, एस.बी. नायकर, आर. वाय. पाटील, सी.एस. कुंभार, यू.ए. पाटील, उत्तम वाडेकर, ए.एस. कुंभार, रामा आचार्य, एस.के. घाटे, शिवानंद कळसद, नवीन के.आर., बी.ए.हिरेमठ, विरुपाक्षी मठद, के.एस.बुर्जे आदी उपस्थित होते.


Recent Comments