राज्य सरकार आणि साखर कारखानदारांकडून उसाला प्रति टन 5,500 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी बुधवार दि. 19 ऑक्टोबर रोजी हुक्केरी तालुक्यातील रक्षी क्रॉसजवळ मोठे आंदोलन करण्यात येणार आहे असे कर्नाटक राज्य रयत संघटना आणि शेतमजूर कल्याण संघटनेचे राज्य सरचिटणीस गोपाळ मरबसनवर यांनी सांगितले.

हुक्केरी शहरात आज प्रसारमाध्यमांशी बोलताना गोपाळ मरबसनवर म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या राज्य सरकार आणि साखर कारखानदारांनी यंदा उसाला प्रतिटन 5,500 रुपये दर जाहीर करावा, साखर कारखान्यांकडून अबकारी शुल्क वसूल करा आणि त्यातील काही भाग शेतकऱ्यांना द्यावा. सगळे मिळून 5,500 हजार रुपये प्रति टन दर द्यावा, या मागणीसाठी उद्या रक्षी क्रॉसवर आंदोलन करण्यात येणार आहे. ऊस उत्पादकांनी त्यात मोठ्या संख्येने सहभाग घेऊन ते यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष झियाउल्ला वंटमुरी, प्रदेश मुख्य संयोजक बाबू जोडट्टी, जिल्हा निमंत्रक बसवराज ग्याळगोळ आदी उपस्थित होते.


Recent Comments