Chikkodi

आगामी निवडणुकीत भाजप १५० हुन अधिक जागा जिंकेल : अरुण सिंग

Share

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप १५० हुन अधिक जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास राज्य भाजप प्रभारी अरुण सिंग यांनी व्यक्त केला.

चिकोडी येथील केशव कलाभुवन येथे संकल्प यात्रेचे उदघाटन करून ते बोलत होते. मणिपूर, उत्तर प्रदेश सह अनेक राज्यांमध्ये भाजपने पुन्हा वर्चस्व सिद्ध केले असून त्याचपद्धतीने कर्नाटकात देखील आगामी विधानसभा निवडणुकीत १५० हुन अधिक जागांवर भाजप विजय मिळवेल, आणि पुन्हा एकदा सत्ता स्थापन करेल, असा विश्वास अरुण सिंग यांनी व्यक्त केला.

यावेळी काँग्रेसवर देखील निशाणा साधत, काँग्रेसने भारत जोडो ऐवजी काँग्रेस जोडणे महत्वाचे असून डीकेशी आणि सिद्धरामय्या जोडो यात्रा कर्नाटकात पार पडल्याचा टोलाही लगावला. चिकोडी – सदलगा मतदार संघातील विजयाची जबाबदारी लक्ष्मण सवदी यांच्यावर असून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली जनतेसाठी देशात चांगले प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे अरुण सिंग यांनी सांगितले.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, आमदार दुर्योधन ऐहोळे, श्रीमंत पाटील, चिकोडी भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश नेरली, मारुती अष्टगी, उज्वला बडवाण्णाचे, शाम्भवी अश्वथपूर, दूंडाप्पा भेंडवाडे आदींसह इतर भाजप नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags:

/chikkodi-jansankalpyatra-arunsingh/