राज्य भाजप प्रभारी अरुण सिंग यांच्या नेतृत्वाखाली चोकडी येथे नुकतीच एक सभा पार पडली. या सभेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अरुण सिंग यांनी काँग्रेसवर टीकाटिप्पणी करत आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्यावर देखील तोफ डागली.


चिकोडी येथे राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत योजना वितरित करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अरुण सिंग म्हणाले, काँग्रेसच्या कार्यकाळात लाभ मिळविलेल्या लाभार्थ्यांची सभा घ्या, या सभेत शून्य उत्तरे मिळतील. तसेच आमदार बसनगौडा पाटील यांच्यामार्फत सातत्याने भाजप सरकारवर होत असलेल्या टीका टिप्पण्यांचाही त्यांनी समाचार घेतला. प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अरुण सिंग म्हणाले, आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ हे ना कोअर कमिटीचे सदस्य आहेत आणि नाही राजकीय नेते आहेत.. ते केवळ एक आमदार आहेत. त्यांच्यावर जी कारवाई व्हायची ती होणारच असा इशारा त्यांनी दिला.
पंचमसाली समाजाच्या आंदोलनाबाबत बोलताना अरुण सिंग म्हणाले, या समाहजतील पाच ते सहा मंत्री कार्यरत आहेत. तसेच या समाजातील स्वामीजींवर पंतप्रधान देखील खुश आहेत. याचप्रमाणे राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असून याबाबत तेच निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.


Recent Comments