Athani

मायनट्टी गावात पाण्याची टाकी कधीही कोसळण्याच्या स्थितीत !

Share

अथणी तालुक्यातील मायनट्टी गावात पाण्याची टाकी जीर्ण होऊन कलंडली असून कधीही कोसळण्याच्या स्थितीत असून, त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

होय, बेळगाव जिल्ह्यातील पार्थनहळ्ळी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या मायनट्टी गावात पाण्याची टाकीला मोठे तडे गेले आहेत. त्यातून पाणीही झिरपत आहे. येथील रस्त्यावरून दररोज हजारो लोक आणि शाळकरी मुले ये-जा करतात. पण टाकीच्या अवस्थेमुळे येथून जाण्यास ते घाबरत आहेत.

उंचावर बांधलेल्या या जलकुंभाचे खांब मोडकळीस आले आहेत. त्यामुळे तो कधी अन कसा कोसळेल याचा नेम नाही. यावर उपाययोजना न करता पाणीपुरवठा आणि निस्सारण मंडळाचे अधिकारी शालेय विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे लोकांच्या जीवावर बेतले आहे. जलकुंभ कोसळला तर मोठी दुर्घटना होणार हे नक्की आहे. त्यामुळे त्याची प्रतीक्षा न करता तातडीने यावर उपाययोजना करावी अशी स्थानिकांची मागणी आहे.

कलंडलेल्या या पाण्याच्या टाकीमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्हा प्रशासनाने ही टाकी तातडीने पाडून करून नवीन पाण्याची टाकी उभारण्याची

Tags:

athani water tank