हुक्केरी तालुक्यातील बस्तवाड गावात तालुका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून ग्रामवास्तव्य कार्यक्रम पार पडला.

सकाळी हुक्केरी तालुक्यातील विविध विभागांचे कार्यक्रम अधिकाऱ्यांचे बस्तवाड गावात आगमन झाल्यावर ग्रामपंचायत सदस्य व शाळकरी मुलांनी त्यांचे मिरवणुकीने स्वागत केले. शासकीय प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ग्रामपंचायत अध्यक्ष आबेदा मल्लापुरे यांनी बँड वाजवून मिरवणुकीचा प्रारंभ केला.

त्यानंतर अधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील विविध मंदिरे व गल्ल्यांमध्ये फेरफटका मारला. यावेळी आरोग्य विभागाच्यावतीने काडसिद्धेश्वर मंदिर परिसरात आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन तहसीलदार डॉ. डी. एच. हुगार यांनी केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांची रक्तदाब व रक्त तपासणी केली.

त्यानंतर सभा भवनात झालेल्या कार्यक्रमात विविध विभागीय अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागीय प्रकल्पांची माहिती देऊन जनतेच्या समस्या ऐकून घेऊन सूचना केल्या.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना तहसीलदार हुगार म्हणाले की, शासकीय योजनांनुसार अधिकाऱ्यांच्या पथकाने गावाला वैयक्तिक भेट देऊन लोकांच्या समस्या ऐकून शासकीय योजनांची माहिती देण्याचा कार्यक्रम आज बस्तवाड गावात आयोजित करण्यात आला आहे.

या नंतर वृद्धांना पेन्शन वॉरंट, भाग्यलक्ष्मी बाँडचे वाटप करण्यात आले. सायंकाळी विविध शालेय गटांतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्या अनुसया पाटील, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी उमेश सिदनाळ, कृषी अधिकारी महादेव पटगुंदी, एडीएलआर शशिकांत हेगडे, पशुसंवर्धन अधिकारी रमेश कदम, ग्रेड टू तहसीलदार किरण बेळवी, आरोग्य अधिकारी उदय कुडची, रेव्हेन्यू अधिकारी प्रवीण माळाज, पीडीओ अशोक कंटी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments