अथणी तालुका अल्पसंख्याक समाज व कल्याण समितीच्या संयुक्त विद्यमाने आज अथणी येथे माजी राष्ट्रपती मिसाइल मॅन ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.

अब्दुल कलाम सर्कल येथे आज, रविवारी मिसाइल मॅन ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. या निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी आमदार शहाजहान डोंगरगाव म्हणाले, भारतातील तामिळनाडूमधील एका छोट्याशा गावात एका सामान्य घरात जन्मलेल्या अब्दुल कलाम यांनी क्षेपणास्त्र संशोधनात मोठे यश मिळवल्याचा सर्वाना अभिमान आहे, ते तरुणांसाठी प्रेरणास्थान होते आणि भारताचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी आदर्श कार्य केले. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी घालून दिलेल्या मार्गावर सर्वांनी चालावे असे आवाहन माजी आमदार शहाजहान डोंगरगाव यांनी केले.
यावेळी अथणी तालुका अल्पसंख्याक कल्याण समितीचे अध्यक्ष अय्याज मास्तर, मुस्लिम धर्मगुरू, रावसाब ऐहोळे, करवे उपाध्यक्षा शब्बीर सातबच्चे व नवनिर्वाचित अंजुमान इस्लाम समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
राकेश मैगुर, आपली मराठी, अथणी.


Recent Comments