घरफोडय़ा करणाऱ्या दोन कुख्यात चोरटयांना जेरबंद करण्यात हुबळीच्या केशवापूर पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेले दोघेही बेळगाव येथील वैभवनगर येथील रहिवासी आहेत.

केशवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोड्यांचा तपास करताना पोलिसांना या चोरट्यांचा सुगावा लागला. त्यानुसार सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 91 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 5 किलो चांदी आणि एक कार जप्त करण्यात आली आहे.
केशवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हेमंतनगरमधील गणपती मंदिराजवळ या चोरट्यांनी घरफोडी करून दागिने लुटले होते. या प्रकरणी अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान दोन्ही आरोपींनी मिळून हुबळी, धारवाड, निपाणी, संकेश्वर, बागलकोट आदी ठिकाणी 25 हून अधिक चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे.


Recent Comments