दोन डोकी असणाऱ्या मांडूळ सापांची अवैधरित्या विक्री करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात बेंडीगेरी पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या दोन डोक्यांचा मांडूळ साप आणि त्याच्या विक्रीसाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे.

हुबळी येथील गब्बूर बायपास जवळील रिलायन्स मॉलजवळ एका कारमधून तिघेजण मांडूळ साप विकण्यासाठी आल्याची माहिती बेंडीगेरी पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कारवाई करत तीन आरोपींना अटक करून साप ताब्यात घेतला. अटक करण्यात आलेले आरोपी रायचूर येथील असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या आरोपींविरुद्ध बेंडीगेरी पोलीस ठाण्यात वन जीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.


Recent Comments