कर्नाटक सरकारच्या विधिमंडळ वचनपूर्ती समितीच्या पथकाने कागवाड मतदार संघाला भेट देऊन विकासकामांची पाहणी केली.

सिंचन, शेती आणि अन्नधान्य उत्पादनाचा अभ्यास करण्यासाठी परदेशात जाण्याऐवजी कागवाड मतदारसंघात जाऊन आमदार श्रीमंत पाटील यांच्या कर्तृत्वाचा अभ्यास करणे पुरेसे आहे, आमदारांनी सर्वच क्षेत्रात खूप काही साध्य केले आहे, असे कर्नाटक सरकार वचनपूर्ती समितीचे अध्यक्ष तथा उडपीचे आमदार के. रघुपती भट्ट यांनी सांगितले.

कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी कागवाड विधानसभा मतदार संघात आपल्या साखर कारखान्याच्या वतीने सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या जमिनी, तलाव आणि लिफ्टची पाहणी शुक्रवारी के. रघुपती भट्ट व सदस्यांनी केली.
कागवाड मतदारसंघातील उत्तरेकडील भागात शेतकऱ्यांची हजारो एकर नापीक जमीन आहे. या जमिनीपासून 20 किमी अंतरावर असलेल्या कृष्णा नदीतून उपसा सिंचन प्रकल्पातून स्वखर्चाने सिंचनाची सोय करून हरितक्रांतीची सुरुवात केली. तसेच, हे सांगताना मला अभिमान वाटतो की, शेतकऱ्यांनी देशाची आर्थिक व्यवस्था आणि अन्नसुरक्षेशी हातमिळवणी केली आहे. कृषी आणि सिंचन क्षेत्रातील कामगिरीची विधानसभेत चर्चा करणार असल्याचे उडपीचे आमदार के. रघुपती भट्ट म्हणाले.

कर्नाटक सरकार वचनपूर्ती समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांसह अधिकाऱ्यांनी आमदार श्रीमंत पाटील यांच्या साखर कारखान्याला भेट दिली, त्यानंतर मदभावीतील प्रगतीशील शेतकरी दिलीप पवार यांच्या उपसा सिंचन तलावा, संबरगीतील गोदाम आणि गुंडेवाडीतील उपसा सिंचन तलावाला त्यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी देवरहिप्परगीचे आमदार सोमनगौडा पाटील, बैंदूरचे आमदार सुकुमार शेट्टी, नेलमंगलचे आमदार डॉ. श्रीनिवास मूर्ती, कर्नाटक पाटबंधारे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मल्लिकार्जुन गुंगे, चिक्कोडीचे प्रांताधिकारी संतोष कामगौडा, अथणी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक बी. आर. राठोड, अथणी शुगर्सचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास पाटील, अथणी तहसीलदार सुरेश मुंजे, पाटबंधारे विभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.


Recent Comments