उप्पार समाजाचा अनुसूचित जाती जमातीमध्ये समावेश करण्यात यावा, यासाठी सरकार दरबारी मागणी करण्यात येत असून उप्पार समाजाच्या या लढ्याला आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी पाठिंबा दर्शविलाय,

रायबाग विधानसभा मतदार संघाच्या अंतर्गत येणाऱ्या विजयनगर, बेलकुड, चन्नवीरहट्टी या गावात विविध विकास कामांचा शुभारंभ करून प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. उप्पार समाजाचा अनुसूचित जाती जमातीमध्ये समावेश करण्यात यावा यासाठी उपचार समाज लढा देत आहे. त्यांच्या या संघर्षाला आपला पाठिंबा आहे, याप्रश्नी सरकारदरबारी आपण प्रस्ताव मांडणार असल्याचे आमदारांनी सांगितले.

यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य पवन कत्ती म्हणाले, अनेक दिवसांपासून कोरेगाव सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी होत असून सदर प्रकल्प मंजूर होण्याच्या प्रक्रियेत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी हिरा शुगरचे संचालक सुरेश बेल्लद, सत्यगौड पाटील, अप्पासाहेब शिरगुर, महांतेश शिरगुर, महेश पाटील लक्ष्मण हममण्णावर, गुरशांत शिरगुर, शिवराज सनदी, शिद्दु, किंडी, अप्पासाहेब खेमलापूर, सदाशिव घोरपडे, तीम्मणा गाडीवड्डर, बिराप्पा पुजारी, बसवराज कुंभार, देवराज पाश्चापुरे, संभाजी चव्हाण, महांतेश चव्हाण, महांतेश यशवंत, मल्लप्पा अरभावी, मल्लिकार्जुन बीड, बी आर कवणी, संदीप मोरे, महादेव पामलदिनी आदी उपस्थित होते.


Recent Comments