Crime

हुबळीत धाकट्या भावाने मोठ्याला चाकूने भोसकले

Share

आपल्याच मोठ्या भावाच्या डोळ्यात चटणी पावडर टाकून त्याच्यावर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना गुरुवारी रात्री हुबळी शहरात घडली.

हुबळी येथील गमनागट्टी परिसरात गुरुवारी रात्री कल्लनगौडा यांचा भाऊ बसवनगौडा याने अचानक घरात घुसून भावाच्या डोळ्यात चटणी पूड टाकून त्याच्यावर चाकूने वार केले.

पोलिसांनी घटनास्थळी येऊन गुन्हा दाखल केला. या प्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे.

Tags:

hbl-brother-stabbed-by-younger