Chikkodi

प्रभाकर कोरे यांच्या अमृतमहोत्सवाला एक लाखाहून अधिक लोक येणार : कवटगीमठ

Share

बेळगाव जिल्हा स्टेडियमवर 15 ऑक्टोबर रोजी होणार्‍या डॉ. प्रभाकर कोरे यांच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात १ लाखाहून अधिक लोक सहभागी होणार असल्याचे माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी आज नणदी येथील चिदानंद कोरे साखर कारखान्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

पत्रकार परिषदेत बोलताना महांतेश कवटगीमठ म्हणाले, शिक्षण, आरोग्य, उद्योग, राजकारण, सामाजिक, धर्म यासह विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या कर्मऋषी डॉ. प्रभाकर कोरे यांचे कार्य कौतुकास्पद आहे. आम्ही डॉ. प्रभाकर कोरे यांचा 75 वा वाढदिवस अमृतमहोत्सव कार्यक्रमाने मोठ्या थाटात साजरा करत आहोत. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्यासह माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे, डॉ. शामनूर शिवशंकरप्पा, महाराष्ट्राचे मंत्री राधाकृष्ण पाटील हे सहभागी होणार आहेत. या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात 1 लाखांहून अधिक लोक सहभागी होणार आहेत, असे महांतेश कवटगीमठ यांनी सांगितले.
बाइट
या पत्रकार परिषदेत चिदानंद कोरे साखर कारखान्याचे अध्यक्ष भरत बनवणे, उपाध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे, डॉ. प्रभाकर कोरे बँकेचे अध्यक्ष महांतेश पाटील, उपाध्यक्ष सिदगौडा मगदूम यांच्यासह चिदानंद कोरे शुगर व डॉ. प्रभाकर कोरे बँकेचे संचालक आदी उपस्थित होते.

Tags:

prabhkar kore birthday mahantesh kavatagimath pressmeet