खानापूर येथे स्थानिक लघु उद्योजकांसाठी ‘उद्योग मेळा’चे आयोजन करण्यात आले होते. हा 4 दिवसीय उद्योग मेळ यशस्वीपणे पार पडला.

खानापूर शहरातील लोकमान्य मंगल कार्यालयात 8 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत सकाळी 10.30 ते रात्री 9 या वेळेत स्थानिक लघु उद्योजकांसाठी ‘उद्योग मेळा’ हा लघु उद्योजक विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 8 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजता तोपिनकट्टीच्या महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक आणि लैला शुगरचे चेअरमन विठ्ठल हलगेकर यांनी या उद्योग मेल्याचे उदघाटन केले. त्या नंतर बोलताना विठ्ठल हलगेकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि देशपांडे फाऊंडेशन निस्वार्थ भावनेने उद्योजकांच्या विकासासाठी काम करत असल्याचा आनंद व्यक्त केला. खानापूर तालुक्यात प्रथमच अशा प्रकारचा उद्योग मेळा आयोजिण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी देशपांडे स्पार्टअप, हुबळीचे प्रकल्प अधिकारी वीरैया हिरेमठ यांनी, या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. या मेळ्यादरम्यान खाद्यपदार्थ, सेंद्रिय वस्तू, विविध प्रकारचे फराळ, धान्य, हातमागाच्या साड्या आणि कपडे, हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. स्थानिक लघु उद्योजकांच्या विकासासाठी शहरातील जनतेने चांगले सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी खानापूर नगरपंचायत सदस्य प्रकाश बैलूरकर, मेघा कुंदरगी, जयंत तिनईकर, बाबू होनुले, सावित्री अजनाळ, शैला गावकर, परमेश्वर गड्डेद आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


Recent Comments