खानापूर तालुक्यातील कुरंगी गावातील तलावामध्ये मासे पकडण्यासाठी गेलेला 26 वर्षाचा तरुणाचा तलावामध्ये बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंजुनाथ तुकाराम वाणी वय वर्ष 26 असे या तरुणाचे नाव आहे.


मंगळवारी हा तरुण तलावामध्ये मासे पकडण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो तलावामध्ये बुडाला. त्यानंतर एसडीआरएफ व अग्निशामक दलाच्या वतीने तलावामध्ये त्याची शोध मोहीम चालू केली.
आज सायंकाळी 6 च्या दरम्यान तलावामध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आला. एसडीआरएफ तसेच अग्निशामक दलाच्या जवानांनी त्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढून नंदगड पोलिसांकडे सुपूर्द केला. मंजुनाथ तुकाराम वाणी, वय 26 वर्ष, राहणार मंग्यानकोप्प (ता. खानापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी नंदगड पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


Recent Comments