Belagavi

दारूची तस्करी करणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद

Share

दुचाकीवरून अवैधरित्या दारूची तस्करी करणाऱ्या आरोपीला मालासह जेरबंद करण्यात बेळगाव उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे.

दुचाकीवर टायर ट्यूबमधून बेकायदेशीररीत्या दारूची तस्करी करत असल्याच्या माहितीच्या आधारे हत्तरगी जवळील अल्डाळ क्रॉसजवळ छापा टाकून एका आरोपीला उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. सदानंद लक्ष्मण नाईक असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपींकडून 6 हजार रुपये किमतीची 60 लिटर हातभट्टीची दारू आणि 1 होंडा शाईन दुचाकी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी यमकनमर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags:

belgaum liquor seized