Kagawad

दि.मीनाताई शिरगावकर यांचा 25 वा स्मृतिदिन; लता मंगेशकर यांनी गायलेल्या हिंदी गीत गायनाचा स्पर्धा

Share

उगार महिला मंडळाचे अध्यक्ष दिवंगत मीनाताई शिरगावकर यांनी महिला मंडळाच्या प्रगतीसाठी विशेष असे योजना राबवल्या होत्या त्यांच्या 25 व्या स्मृतिदिन वर्षीही त्यांच्या कार्याची आठवण प्रत्येकाने होत राहते असा गौरव उद्गार उगार महिला मंडळाचे अध्यक्ष स्मिताताई शिरगावकर यांनी व्यक्त केल्या.
मंगळवारी उगार येथील विहार सभा भवन येथे दिवंगत मीनाताई शिरगावकर यांचा 25 वा स्मृतिदिन एक आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने आयोजित केला होता. दिवंगत गायिका लता मंगेशकर यांनी गायलेल्या हिंदी गीत गायनाचा स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या.

या स्पर्धा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावच्या त्यात गायिका व संगीत प्रेमी धनश्री आपटे यांच्या मुख्य उपस्थितीत कार्यक्रम पार पाडण्यात आला.
या गीत गायन स्पर्धेचे परीक्षक म्हणून बेळगावचे सुप्रसिद्ध संगीतकार राहुल लोहार व स्वाती कुलकर्णी यांनी काम पाहिले.
या स्पर्धेमध्ये सांगली बेळगाव कोल्हापूर या जिल्ह्यातून अनेक महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दिवंगत मीनाताई शिरगावकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून नटराज मूर्तीचे सर्व स्पर्धकांच्या उपस्थितीत पूजा करण्यात आले.

यामध्ये प्रथम क्रमांक कोल्हापूर येथील रुद्रांश ग्रुप यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक बेळगाव येथील शिवम ग्रुपच्या महिलांनी पटकावला.
तृतीया क्रमांकाचे बक्षीस सांगली येथील स्त्री सखी ग्रुपच्या महिलांनी पटकावला.
या यशस्वी स्पर्धाकाना अनुक्रमे बारा हजार, दहा हजार, व आठ हजार रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता महिला मंडळाच्या अध्यक्षा स्मिताताई शिरगावकर, उपाध्यक्षा राधिकाताई शिरगावकर, संचालिका गीतांजली शिरगावकर, गौरीताई शिरगावकर, साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रफुल शिरगावकर यांच्या मुख्य उपस्थितीत महिला मंडळाच्या सेक्रेटरी अनिता पुजारी, रेखा पिंपळकर, साधना ढेरे, स्मिता होगार, मेघना कुलकर्णी सह महिला सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले .

Tags:

latamangeshkar songs