Kagawad

कागवाड शिवानंद महाविद्यालयात व्याख्यानमालेचे आयोजन

Share

कागवाड शिवानंद महाविद्यालयात बौद्धिक संपदा हक्क संरक्षण या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

बौद्धिक संपदा हक्क हा मालमत्तेचा एक वर्ग म्हणून विकसित झाला असून यामध्ये मानवी बुद्धीच्या अद्भुत निर्मितीचा समावेश आहे. याचे अनुकरण कोणीही करू शकत नाही आणि चोरूही शकत नाही, असे मत संकेश्वर एस.एस.एस.एन. महाविद्यालयाचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक बी जी पाटील यांनी व्यक्त केले.

मंगळवारी कागवाड येथील शिवानंद महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग आणि सामाजिक शास्त्र विभाग यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते.

कॉपीराईट, पेटंट, ट्रेडमार्क, औद्योगिक रचना, भौगोलिक निर्देशक, व्यापारी रहस्ये यासारखी विविध

प्रकारची बौद्धिक संपदा प्रचलित आहे. या सर्व गोष्टींना समजून घेणे आणि त्यांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे मत प्रा. बी जी पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. व्ही एस तुगशेट्टी बोलताना म्हणाले, भारतात बौद्धिक संपदा कायद्यांतर्गत अनेक हक्क आहेत. कॉपीराईट कायदा १९५७ च्या कायद्यातील सुधारित कायदा, मार्क ऍक्ट १९९९, डिझाईन ऍक्ट २०००, पेटंट ऍक्ट २००५ यासह अनेक बौद्धिक संपदा हक्क संरक्षण देणारे असल्याची माहिती तुगशेट्टी यांनी दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कावेरी ब्याकोड यांनी ईशस्तवन गायिले. आयक्युसी संयोजक डॉ. एस. पी. तळवार यांनी स्वागत आणि परिचय करून दिला, डॉ. एस. ए. कारकी यांनी प्रास्ताविक केले तर प्रो. एस. एम. घोरपडे यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Tags:

kagawad shivanand mahavidyalay