Hukkeri

तीन कार व दुचाकीच्या अपघातात आई, मुलगा ठार; चालक जखमी

Share

तीन कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील रक्षी क्रॉसजवळ घडली.

रविवारी रात्री आठच्या सुमारास हा विचित्र अपघात घडला. बैलहोंगल तालुक्यातील मल्लापूर गावातील 28 वर्षीय भारती अनिल पुजारी आणि त्यांचा मुलगा 6 वर्षीय वेदांत पुजारी या दोघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आणलं पुजारी हे पत्नी भरती आणि मुलगा वेदांत याना घेऊन दुचाकीवरून घटप्रभाकडे जात होते. त्यावेळी समोरून आलेल्या घटप्रभेकडून हुक्केरीकडे जाणाऱ्या इंडिका व्हिस्टा कारने दुचाकीला धडक दिली. उगाच दरम्यान, हुक्केरीकडून गोकाककडे जाणाऱ्या सफारी आणि एर्टिगा या तिन्ही कारच्या चालकांचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. यात अनिल पुजारी आणि इंडिकाचा चालक किरण सालीमठ गंभीर जखमी झाले असून अन्य कारचे चालक किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना हुक्केरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हुक्केरी सीपीआय रफिक तहसीलदार व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हुक्केरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

hukkeri accident 2 death