विविध सरकारी विभाग आणि वाल्मिकी समाजाच्या वतीने आज हुक्केरी शहरात महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
हुक्केरी तालुका प्रशासन, तालुका पंचायत, अनुसूचित जाती कल्याण विभाग व समाजकल्याण, नगरपालिका हुक्केरी, संकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबू जगजीवनराम भवन येथे हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर महास्वामी, जारकीहोळी येथील कृपानंद स्वामीजी आणि हेब्बाळ येथील बसव चेतन स्वामीजी यांच्या दिव्य उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. तहसीलदार डॉ. डी. एच. हुगार यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
अनुसूचित जाती कल्याण अधिकारी जयश्री गोटुरी यांनी स्वागत करून प्रास्ताविकात वाल्मिकी महर्षींचे आदर्श व विभागाच्या योजनांची माहिती दिली.


व्यासपीठावर नगराध्यक्ष ए. के. पाटील, उपाध्यक्ष आनंद गंध, तापं मुख्याधिकारी उमेश सिदनाळ, जागृती उपविभाग समिती सदस्य रमेश हंजी, अनुसूचित जमातीचे नेते मयूर गस्ती आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तहसीलदार डी. एच.हुगार म्हणाले की, रामायण लिहिणारे वाल्मिकी हे या देशाचे महान तत्त्वज्ञ आहेत, त्यांनी रामायणात मांडलेले सर्व मुद्दे आजही समर्पक आहेत, वाल्मिकी समाजाच्या लोकांनी त्यांच्या कल्याणासाठी आखलेल्या शासनाच्या विविध योजनांचा चांगला उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले.
याप्रसंगी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नंतर कन्नड भाषेचे शिक्षक राजेंद्र पंगन्नावर यांचे व्याख्यान झाले.
यावेळी अनुसूचित जातीचे नेते, विविध विभागांचे अधिकारी व महर्षी वाल्मिकी यांचे चाहते उपस्थित होते.


Recent Comments