Chikkodi

डिसेंबरअखेर करगाव पाटबंधारे प्रकल्पाचे काम सुरू होणार : आ. दुर्योधन ऐहोळे

Share

करगाव पाटबंधारे प्रकल्प कार्यान्वित करण्याची लोकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. येत्या डिसेंबरअखेर करगाव पाटबंधारे प्रकल्पाचे काम सुरू होणार असल्याची माहिती आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी दिली.

रायबाग मतदारसंघांतर्गत जैनापूर, करोशी, बंबलवाड येथून 1.50 कोटी रुपये खर्चून रस्त्याच्या सुधारणा आणि उमराणी, करोशी मजलती, वडराळा या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 2 कोटी रुपये खर्चातून करावयाच्या कामांना चालना दिल्यानंतर ते बोलत होते. पुढील आठवड्यात प्रकल्पाला मंजुरी मिळण्याची अशा आहे. करगाव पाटबंधारे प्रकल्पाचे काम डिसेंबरअखेर सुरू होईल असे आ. दुर्योधन ऐहोळे यांनी सांगितले.

यावेळी हेस्कॉमचे संचालक महेश भाटे म्हणाले की, करगाव उपसा जल सिंचन प्रकल्पाचा या भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

यावेळी एपीएमसीचे उपाध्यक्ष रायगौडा पिलीमणी, जैनापूर ग्रापं अध्यक्ष सुरेश गारगुडे, बंबलवाड ग्रापं अध्यक्ष भरमप्पा हुचन्नवर, हसन सनदी, महंतेश भाटे, दुंदय्या पुजारी, राजू हेगण्णावर, रामगौडा पाटील, दस्तगिर सनदी, विजय कुरुबार, नारायण राणे, कल्लापा कुरबर, बाळू मुगळी, अण्णाप्पा शेंडुरे, फारूक पटेल, महेश चव्हाण, रवी हिराकोडे, ठेकेदार बसू माळगी, जगदीश भाटे, सदाशिव घोरपडे, राजू हेगण्णावर आदी उपस्थित होते.

Tags:

chikkodi duryodhan aihole