ऑल इंडिया मुजलीस ए इत्ताहादूल पक्षाच्यावतीने हुक्केरी तालुक्यात सामाजि कार्य करण्यात येणार आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हाध्यक्ष अलम सनदी यांनी दिली.

हुक्केरी शहरात ऑल इंडिया मुजलीस ए इत्ताहादूल या पक्षाच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली यावेळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. हुक्केरी तालुक्यात एआयएमआय पक्षाच्यावतीने धर्मनिरपेक्ष उमेदवार उभा करण्यात येणार असून पक्षाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक कार्य करण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनात्मक हक्कांची अंमलबजावणी होईल, असा विश्वास त्यांना व्यक्त केला.
एआयएमआय च्या नूतन तालुका अध्यक्षपदी मशीन मुल्ला, सचिव बाबाजानी मकानदार, इम्रान बेपारी, सद्दाम हुसेन मुल्ला, मोहम्मद हुसेन तटगार, इरफान मुनियार, जुबिहुल्ला मोमीन, सोहिज जमादार, इरफान मुजावर, जमीर अहमद मुल्ला आदींची नूतन कार्यकारिणीत निवड करण्यात आली आहे.
यावेळी बेळगाव जिल्हा सहसचिव नावीद जमादार, सर्फराज खानजादे आदी उपस्थित होते.


Recent Comments