Athani

अथणी येथे एम बी पाटील यांचा वाढदिवस

Share

माजी गृहमंत्री, जलसंपदा मंत्री आणि बबलेश्वर मतदार संघाचे विद्यमान आमदार एम बी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज अथणी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

आमदार एम बी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अथणी सरकारी रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. काँग्रेस नेते गजानन मंगसुळी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गर्भवती महिलांनाही फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार एम बी पाटील यांना दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना करण्यात आली.

यावेळी तेलसंग ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष श्रीकांत पुजारी बोलताना म्हणाले, आमदार एम बी पाटील यांच्या ५८व्या वाढदिवसानिमित्त आज काँग्रेस नेते गजानन मंगसुळी यांच्या नेतृत्वाखाली फळांचे वाटप करण्यात आले आहे. सरकारी रुग्णालयातील रुग्णांसाठी फळवाटप करण्यात आले असून आमदार एम बी पाटील हे आधुनिक भगीरथ असल्याचे ते म्हणाले. जनतेपर्यंत सर्व सरकारी योजना पोहोचाव्यात यासाठी आमदार एम बी पाटील हे नेहमी प्रयत्नशील असतात, जनतेचा विचार करणाऱ्या अशा लोप्रतिनिधीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना त्यांनी केली.

यावेळी नगरपालिका सदस्य रावसाब ऐहोळे, सुरेश गौड पाटील, शिवू गुड्डापूर, सुनील संक, राहुल माचकनूर, रवी बडकंबी, प्रशांत इजारे, मल्लिकार्जुन बुटाळी, प्रमोद बेल्ळूर, विलिनराज एळमल्लि, काँग्रेस तेलसंग महिला ब्लॉक काँग्रेस अध्यक्षा कलावती कित्तूर, सुनीता ऐहोळे, सविता शिंगे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

Tags: