Hukkeri

हुक्केरीत मनस्विनी-२ कार्यक्रमाचे आयोजन

Share

हुक्केरी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे ए बी अवॉर्ड्स लवकरच देण्यात येणार आहेत, अशी माहिती संकेश्वर एस डी व्ही एस संघाचे स्थानिक नियंत्रण समितीचे अध्यक्ष विनय पाटील यांनी सांगितले.

हुक्केरी येथील श्री दूरदुन्डेश्वर विद्यावर्धक संघाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य पदवीपूर्व महाविद्यालयाच्या मनस्विनी-२ या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, सीमावर्ती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक व्यासपीठ निर्माण करून आमची संघटना कलात्मक आणि सांस्कृतिक कलागुणांना वाव देण्यासाठी एबी अवॉर्ड्स लवकरच सुरु करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

मनस्विनी कार्यक्रमाचा शुभारंभ माजी मंत्री ए बी पाटील यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी विनोदी कलाकार चिल्लर मंजू, चित्रपट अभिनेते शिरीष माळसीमे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्राचार्या सर्वमंगला यरगट्टी बोलताना म्हणाल्या, मागील वर्षीपासून मनस्विनी कार्यक्रमाच्या माध्यमातून गरीब आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपली कला सादर केली. विनोदी कलाकार चिल्लर मंजू यांनी नृत्य सादरीकरण करून कलाकारांचे मनोरंजन केले. संघटक ए बी पाटील आणि मीनाक्षी पाटील या दाम्पत्याने झांज पथक आणि नवदुर्गेच्या वेशभूषेत आलेल्या कलाकारांचा सत्कार केला. यावेळी एस डी व्ही एस संघाचे उपाध्यक्ष जी एस इंडी, संचालक जी डी मुडसी, डी एस कत्ती, आर बी पाटील, बसनगौडा पाटील, सचिव जी सी कोटगी, बी ए पुजार, आय ए चौगुले, बदलावणे बेळकु या संस्थेचे अध्यक्ष शिवानंद हिरट्टी आदी उपस्थित होते.

Tags:

starts new A B awards says vinay patil