चिक्कोडी तालुक्यातील सदलगा नगरपालिकेत भाजपकडून बी.फॉर्म मिळवून विजयी झाल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या 4 प्रभाग सदस्यांचे सदस्यत्व न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या 4 प्रभागांत येत्या 30 तारखेला फेरनिवडणूक घेण्यात येणार आहे.


एकूण 23 प्रभाग सदस्य आणि शासनाचे 5 नामनिर्देशित सदस्य असलेल्या पालिकेत प्रभाग क्रमांक 5, 12, 15 आणि 16 मधील सदस्य अपात्र ठरले आहेत. या चार खुल्या प्रभागांची फेरनिवडणूक ऑक्टोबर 30 रोजी होणार आहे. नगरपालिकेच्या हद्दीत 10 तारखेपासून आचारसंहिता लागू होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा 17 तारखेचा शेवटचा दिवस आहे. 20 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. रविवारी 30 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत निवडणूक होणार असून 31 रोजी निकाल जाहीर होणार आहेत.



Recent Comments