बैलहोंगल तालुक्यातील ओकुंद गावातील वृद्धा रुद्रम्मा बसवानेप्पा होंगल उर्फ कुदरी यांनी मृत्यूनंतर नेत्रदान करून जीवनाचे सार्थक केले आहे.

ओकुंद गावातील 93 वर्षीय रुद्रम्मा होंगल यांनी मंगळवारी रात्री वयोमानाशी संबंधित आजारांमुळे राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. नंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या निर्णयानुसार त्यांनी बैलहोंगलच्या डॉ. रामण्णावर यांच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बेळगावच्या केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या नेत्र भांडारात नेत्रदान केले.
यामुळे दोन अंधांच्या जीवनात प्रकाशपर्व उजाळणार आहे. बुधवारी सकाळी ओकुंद गावातील स्मशानभूमीत आजींवर लिंगायत विधीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, भाची, जावई, नातवंडे असा परिवार आहे.


Recent Comments