Chikkodi

सायरन वाजताच गाव होते मोबाइलपासून दूर!

Share

हल्लीच्या डिजिटल युगात मोबाईल कुणाच्या हातात नाही असे होणे शक्य नाही. लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यत प्रत्येकाच्या हातातील मोबाईल हा एका खेळण्याप्रमाणे वापरला जात आहे. मात्र मोबाईलचे वेड हे घातक असल्याचे जाणून घेऊन सांगलीतील मोहिते वडगाव गावात एक अनोखी मोहीम राबविण्यात येत आहे.. नेमकी काय आहे हि मोहीम? याबद्दल जाणून घेऊयात या विशेष रिपोर्टमधून…

सायंकाळी ७ वाजता सायरन वाजला की, सांगलीतल्या मोहिते वडगाव गावातील मोबाईल आणि टीव्ही बंद होतात. मग मुलांचा अभ्यास आणि महिलांचा स्वयंपाक करणे सुरू होते. मोबाईल आणि टीव्हीमुळे मुलांच्या शिक्षणावर झालेल्या दुष्परिणामांच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील मोहिते वडगावमध्ये सायंकाळी ७ वाजल्यानंतर गावातील सर्व टीव्ही आणि मोबाईल बंदचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गेल्या एक महिन्यापासून गावात हा उपक्रम सुरू आहे. कोविडमुळे सुरु झालेल्या ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या हाती मोबाईल आले. मात्र याचे व्यसन मुलांना लागू नये यासाठी गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

सायंकाळी ७ वाजता सायरन वाजला कि गावातील सगळे टीव्ही बंद होतात. मोबाईल हातातून बाजूला ठेवले जातात. यावेळेत मुलांनी सक्तीने अभ्यास करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सांगलीतील मोहिते वडगाव गावाने घेतलेला निर्णय हा खरोखरच कौतुकास्पद आणि अनुकरणीय असा आहे.

Tags:

student learning